पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाचे पार्टीवेअर लवकरच विक्रीसाठी होणार उपलब्ध

दीपिका पादुकोन

अभिनेत्री दीपिका पादुकोन दर महिन्याला तिचे काही निवडक कपडे, अॅक्सेसरीज् विक्रीसाठी आणते. या वस्तूंच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांचा सदुपयोग हा तिच्या स्वयंसेवी संस्थेसाठी केला जातो. पुढील महिन्यात दीपिका चाहत्यांसाठी तिचं खास पार्टीवेअर कलेक्शन आणणार आहे. 
यात जॅकेट, ब्लॅक जम्पसूट, मेटॅलिक बेल्ट, ऑरेंज गाऊन, आणि एका प्रसिद्ध चॅटशोमध्ये परिधान केलेल्या पँटचाही समावेश आहे. २ डिसेंबरला दीपिकाच्या वेबसाईटवर हे पार्टीवेअर कलेक्शन उपलब्ध होणार आहे. 

विक्की वेलिंगकर : ठेका धरायला लावणारं नवं गाणं ऐकलंत का?

नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या दीपिकानं 'द लिव, लव, लाफ फाउंडेशन'ची स्थापना केली. याद्वारे मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यात येते तसेच नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या अनेकांना त्यातून बाहेर येण्यासाठी मदतीचा हात दिला जातो. या संस्थेला आर्थिक मदत व्हावी यासाठी दीपिका आपल्या कपड्यांच्या विक्रीतून निधी गोळा करत आहेत.

'गोलमाल ५' येणार, अजय- रोहितचा दुजोरा

गेल्या दोन महिन्यांत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून  अल्पावधितच या क्लोसेटची विक्री होत आहे.