पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमानच्या त्या वक्तव्यामुळे दीपिका नाराज

दीपिका पादुकोन

दीपिका पादुकोन ही सध्याच्या घडीची बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री होय. काही वर्षांपूर्वी दीपिका खुलेपणानं नैराश्यावर बोलली. आपण नैराश्येच्या गर्तेत अडकलो आहोत हे  तिनं जगासमोर कबुल केलं. असं धाडस यापूर्वी क्वचितच एखाद्या अभिनेत्रीनं दाखवलं असेन त्यामुळे अनेकांनी दीपिकाच्या धाडसाचं कौतुक केलं. मात्र सलमान खाननं केलेल्या एका वक्तव्यामुळे दीपिका दुखावली गेली.

दिया-साहिलला भेटलेच नाही, घटस्फोटासाठी जबाबदार धरलेल्या कनिकाचा खुलासा 

माझ्यासाठी नैराश्य खडतर प्रवासासारखं आहे. प्रत्येक सेकंद हा माझ्यासाठी खडतर होता. क्षणाक्षणाला माझा जीव घुसमटत होता. मात्र नैराश्य आणि दु:खी असणं यात नेहमीच लोक गल्लत करतात. मला नैराश्याची चैन परवडायची नाही असं एक अभिनेता म्हणाला होता. नैराश्याच्या गर्तेत अडकणं हा पर्याय असल्यासारखाचं तो सांगत होता.'  असं दीपिका वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 

ये तोहफा हमने खुद को दिया है !, कंगनानं घेतली आलिशान कार

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सलमाननं नैराश्यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. 'आजकाल बरेच लोक सुट्टीवर जातात, सुट्ट्यांची चैन मला परवडायची नाही. अनेक लोक नैराश्याच्या  गर्तेत अडकत आहेत पण तिही चैन मला न परवडण्यासारखीच आहे', असं सलमान म्हणाला होता यावर दीपिकानं सलमानचं नाव न घेता नाराजी व्यक्त केली आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Deepika Padukone calls out Salman Khan for saying cant afford that luxury of being depressed