पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाने जाळले ‘छपाक’चे प्रोस्थेटिक्स

छपााक

बाजीराव मस्तानी, राम लीला, पद्मावत, पिकू सारख्या चित्रपटात प्रभावी भूमिका साकारलेली अभिनेत्री दीपिका पादुकोन लवकरच मेघना गुलजार हिच्या ‘छपाक’ चित्रपटात दिसणार आहे. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच आहे. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालवर हा चित्रपट आधारलेला आहे. 

दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत दीपिकानं साकारलेल्या भूमिकांपैकी हा चित्रपट खूपच वेगळा आहे. या चित्रपटाच्या  चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी दीपिकानं प्रोस्थेटिक्स जाळून टाकले. 

जान्हवीनं घेतली 'आर्ची'ची भेट

अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेप्रमाणे दिसण्याकरता दीपिकाला प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घ्यावी लागली होती. प्रोस्थेटिक्स मेकअप करण्यासाठी जवळपास तीन तास लागायचे. हा मेकअप उतरवण्यासाठी जवळपास १ तास लागायचा. हा मेकअप खूपच महाग होता. दीपिकानं असाच एक  प्रोस्थेटिक्स तयार करून घेतला आणि शेवटच्या दिवशी तो जाळून टाकला.

दीपिका- रणबीरची जोडी पुन्हा दिसणार एकत्र ?

तो जळून खाक होईपर्यंत दीपिका तिथेच उभी होती. ही भूमिका साकारत असताना मला अनेक अनुभव आले. त्याचा माझ्या मनावर  अत्यंत खोलवर परिणाम झाला. मला मनातून ती नकारात्मकता काढून टाकायची होती, म्हणूनच मी चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी प्रोस्थेटिक्स जाळून टाकले, असं दीपिका म्हणाली.