पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाच्या पदरात दुसरा हॉलिवूड चित्रपट?

दीपिका पादुकोन

अभिनेत्री दीपिका पादुकोन ही सध्या बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.  तिनं पिकू, बाजीराव मस्तानी, पद्मावत, रामलीला सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिचा 'छपाक' हा चित्रपटही नव्या वर्षांच्या पहिल्याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. बॉलिवूडमध्ये राज्य गाजवत असलेल्या या सौंदर्यवतीनं आंतरराष्ट्रीय माध्यमांचंही लक्ष वेधून घेतलं आहे. तिनं 'xxx : द रिर्टन ऑफ झँडर  केज'मध्ये काम केलं आहे. हा तिचा  पहिला हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. 

सलमानच्या घरी बॉम्ब, १६ वर्षांचा मुलानं पोलिसांना दिली खोटी माहिती

या चित्रपटानंतर  दीपिकाच्या पदरात आणखी एक हॉलिवूड चित्रपट आला आहे. याच चित्रपटाच्या पुढच्या भागातदेखील दीपिका दिसणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत आणि याला कारण ठरली आहे ती चित्रपटाचा मुख्य हिरो विन डिझेलची नवी पोस्ट. 

या पोस्टमध्ये त्यानं 'झँडरकेज ४' येणार याची पुसटशी कल्पना चाहत्यांना दिली आहे विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यानं दीपिकाच्या नावाचाही उल्लेख केला आहे, त्यामुळे 'झँडरकेज ४' मध्ये दीपिकाही दिसणार अशा चर्चा जोर धरु लागल्या आहेत. 

अक्षयनं पत्नीला भेट दिले कांद्याचे झुमके