पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'छपाक'च्या यशासाठी दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी

(छाया सौजन्य : manav manglani/ इन्स्टाग्राम)

 अभिनेत्री दीपिका पादुकोन ही 'छपाक' चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. २०२० मधला प्रदर्शित होणारा 'छपाक' हा दीपिकाचा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट आज देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या यशासाठी दीपिका मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आली. 

 दीपिकानं सिद्धिविनायकाच्या चरणी माथा टेकवत 'छपाक' च्या यशासाठी प्रार्थना केली. तसेच निर्मिती क्षेत्रातील वाटचालीसाठी बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यापूर्वी अनेकदा दीपिका मंदिरात दर्शनासाठी आली आहे. 

VIDEO : वेश पालटून दीपिका मुंबईतल्या रस्त्यावर फिरली आणि....

२०१८ साली 'पद्मावत' प्रदर्शित झाल्यानंतर दीपिका २०१९ या वर्षांत कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. साधरण दीड वर्षे ती रुपेरी पडद्यापासून लांब होती.  तिनं 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. मात्र एका चाकोरीत न अडकता नव्या वर्षांची सुरुवात दीपिकानं एका धाडसी निर्णयानं केली. 

तिनं चाकोरीबाहेरचा पण महत्त्वाचा चित्रपट निवडला. अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनसंघर्षावर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटात दीपिका अॅसिड हल्ल्यातील पीडितेची भूमिका साकारत आहे.

दीपिकाचा सरकारी जाहिरातील प्रोमो व्हिडीओ हटवला