देश कोरोनाबरोबरच आर्थिक संकटाचाही सामना करत आहे. अनेक कंपन्या, मालक असंवेदनशील वागत त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत आहेत. मात्र संकटाच्या समयीदेखील माणूसकी जिवंत आहे याचं उत्तम उदाहरण अभिनेता दीपक दोब्रीयाल यानं दाखवून दिलं आहे. बॉलिवूडमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम करणाऱ्या दिपकनं त्याच्यासाठी काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना पगार देण्याचं आश्वासन दिलंय. त्यांचे पगार देण्यासाठी मला कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल मात्र मी त्यांना मदत करणार आहे असं दिपक हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाला.
बच्चन यांचे पहिलेच फोटोशूटच पाहिले का?
'आमच्यासारख्या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागत आहे तर तुम्ही कल्पना करा की गरीब लोकांना किती कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असेल. माझ्यासाठी ६ ते ७ लोक काम करत आहेत. मी त्यांना आश्वासान दिलंय की मला कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल मात्र याही परिस्थितीत मी तुम्हाला पगार देतच राहिनी. मला जेवढी शक्य आहे तितकी मदत मी त्यांना करणार आहे', असं दिपक म्हणाला.
शाहरूखकडून राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार PPE किट्स
वर्षांतून मी एकच चित्रपट करतो, माझ्याकडे फार पैसे नाहीत मात्र शक्य असेल तितकी मदत करण्याचं मी ठरवलं आहे, असं दिपकनं सांगितलं. दिपकचा हा दिलदारपणा पाहून सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.