पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेत्यानं नाकारली सलमानची ऑफर

दिपक डोब्रीयाल

अनेक चित्रपटांत सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता दिपक डोब्रीयाल यानं सलमान खानची ऑफर नाकारली आहे. सलमाननं दिपकला आगामी चित्रपट 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र चित्रीकरण्याचे वेळापत्रक जुळून येत नसल्यानं दीपिकनं ही ऑफर नाकारली. 

पिझ्झा डिलिव्हरी बॉयनं अडल्ट ग्रुपवर शेअर केला अभिनेत्रीचा नंबर

दीपिकनं सलमानसोबत 'दबंग २' चित्रपटात काम केलं होतं, या चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत दिसला होता. 'मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती, मात्र मी अंग्रजी मीडियम आणि इतर चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. राधेच्या चित्रीकरणासाठी वेळ द्यायला तारखा उपलब्ध नव्हत्या. वेळापत्रकाचं गणित जुळून येत नव्हतं, म्हणून चित्रपटाला नकार दिला' असं  दिपकनं पीटीआयशी बोलताना सांगितलं.

या दिवशी पाहता येणार 'Into the Wild' चा विशेष भाग

दिपक अंग्रेजी मीडियम या इरफान खान करिना कपूरच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तो यापूर्वी हिंदी मीडियम या चित्रपटातही इरफानसोबत दिसला होता.