पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दे धक्का २' वरुन उच्च न्यायालयात सुरु असलेल्या वादावर निकाल

दे धक्का २

जवळपास आठ-दहा महिन्यांपूर्वी 'दे धक्का' चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली होती. अमेय खोपकर एंटरटेन्मेटकडून 'दे धक्का २' ची घोषणा करण्यात आली होती मात्र यावरुन वाद सुरु होता, कारण दे धक्का या चित्रपटाची निर्मिती झी कडून करण्यात आली होती. त्यामुळे दे धक्काचे हक्क झीकडे असून, दे धक्का २ ची निर्मिती अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला करता येणार नाही असे झीचे म्हणणे होते. हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते. अखेर या वादावर उच्च न्यायालयानं निकाल दिला आहे. 

मी वसंतराव : सुरसम्राट आजोबांची भूमिका साकारणार नातू

या निकालामुळे अमेय खोपकर एंटरटेन्मेंटच 'दे धक्का २' ची निर्मिती करणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 'दे धक्का २' ची निर्मिती अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला करता येणार नाही असे झीचे म्हणणे होते. या वरून निर्माण झालेला वाद सहा महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन नुकताच त्यावर निकाल दिला. उच्च न्यायालयाने झीचा दावा फेटाळून 'दे धक्का २' च्या निर्मितीचा अधिकार अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला असल्याचे नमूद केले. त्यामुळे अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला  'दे धक्का २' या चित्रपटाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

‘तारक मेहता' मधील भाषेच्या वादावरून 'चंपक चाचां'चा मराठीतून माफीनामा

मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी, गौरी वैद्य यांची  प्रमुख भूमिका असलेला 'दे धक्का' हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. तो खूपच लोकप्रिय ठरला होता. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूपच आवडली होती. तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी जुलै महिन्यात चित्रपटाची घोषणा केली होती. ३ जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणं अपेक्षित होतं मात्र यावरुन वाद सुरु होता.