पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रजनीकांतच्या 'दरबार'ची बॉक्स ऑफिसवर डबल सेंच्युरी

दरबार

रजनीकांत यांच्या  'दरबार'नं बॉक्स ऑफिसवर तब्बल २०० कोटींचा गल्ला जमवला आहे.  'दरबार'ची एकूण ११ दिवसाची  ही कमाई आहे. 'एथंरिन', 'कबाली', '२.०' आणि 'पेट्टा'नंतर 'दरबार'नं २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. ही जगभरातील एकूण कमाईची आकडेवारी आहे. 

'गुलाबो..' मुळे 'चेहरे'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली

'दरबार' चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषेत जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं सर्वाधिक  कमाई तामिळनाडूत केली आहे. तामिळनाडूत ९ जानेवारीला हा एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला होता. तामिळनाडूतील आतापर्यंतचा एकूण कमाईचा आकडा हा ८० कोटींचा आहे. केरळ आणि कर्नाटक या दोन राज्यात 'दरबार'नं अनुक्रमे ८ कोटी आणि १९ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर हिंदी भाषेत  प्रदर्शित झालेल्या 'दरबार'नं केवळ ८ कोटींची कमाई केली आहे. 

बायोपिकसाठी दीपिकाचा नकार अन् ऐश्वर्याला मिळाली संधी?

बॉलिवूडमध्ये १० जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ' छपाक' आणि 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटांचं मोठं आव्हान  'दरबार' समोर होतं.जवळपास २५ वर्षांनी रजनिकांत पोलिसाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीनंतर रजनीकांत यांना या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली.