पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दबंग ३ : सई मांजरेकरची धमाकेदार एण्ट्री

सई मांजरेकर

मराठी अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी  सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पणास सज्ज झाली आहे. 'दबंग ३' मध्ये  ती सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातला सईचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. 

आलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल

सई या चित्रपटात सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारणार अशी चर्चा आहे. सई यापूर्वी सलमानसोबत अवॉर्ड शो दरम्यान  दिसली होती. सलमाननं यापूर्वी अनेकांना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. खुद्द 'दबंग ३' मधली मुख्य अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानंही याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण  केलं होतं. 

 सईच्या पदार्पणाविषयी महेश  मांजरेकरदेखील उत्सुक आहेत.  महेश मांजरेकरदेखील या चित्रपटात  एक लहानश्या भूमिकेत दिसणार आहे. मुलीच्या पदार्पणाच्या चित्रपटात मी देखील दिसणार याचा मला आनंद आहे, असं महेश मांजरेकर म्हणाले. २० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लेडी गागा आणि बप्पी लहरी वर्षाअखेरिस घेऊन येणार हिंग्लिश गाणं