पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनाथ मुलांसाठी सौरउर्जा प्रकल्प, उद्धाटनासाठी सई मांजरेकर फलटणमध्ये

सई मांजरेकर फलटणमध्ये

'दबंग ३' चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकतीच सई एका सौरउर्जा प्रकल्पाचे उद्धाटन करण्यासाठी  साताऱ्यातील फलटणमध्ये पोहोचली. या सौरउर्जा प्रकल्पामुळे गावातील ३०० हून अधिक अनाथ मुलांना गरम पाणी उपलब्ध होणार आहे. 

सईच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थीदेखील उपस्थित होते.  सौरउर्जा प्रकल्पामुळे  श्री. गाडगे महाराज आश्रमशाळेतील मुलांना २४ तास गरम पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

बिग बॉस १३ चं चित्रीकरण लांबणार, सलमानला मिळणार सर्वाधिक मानधन

सलमान सोबत या चित्रपटातून सई बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. सई या चित्रपटात सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारणार अशी चर्चा आहे. दबंग ३ हा चित्रपट प्रीक्वल असल्याचं म्हटलं जात आहे. 

सईच्या पदार्पणाविषयी महेश  मांजरेकरदेखील उत्सुक आहेत.  महेश मांजरेकरदेखील या चित्रपटात  एक लहानश्या भूमिकेत दिसणार आहे. मुलीच्या पदार्पणाच्या चित्रपटात मी देखील दिसणार याचा मला आनंद आहे, असं महेश मांजरेकर म्हणाले. २० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'गर्ल्स'मध्ये झळकणार स्वानंद किरकिरे