सलमानचा दबंग ३ डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण पार पडलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकरदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
शाहिद- मीरा राहणार वरळीच्या आलिशान घरात?
सलमान हा बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक नवोदितांचा गॉडफादर म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत या क्षेत्रातल्या अनेक कलाकारांना सलमाननं संधी दिली आहे. यावेळी दबंग ३ साठी सलमाननं आपले जवळचे मित्र महेश मांजरेकर यांच्या मुलीला संधी दिली आहे. दबंग ३ हा प्रीक्वल असणार आहे. पोलिस अधिकारी चुलबुल पांड्ये होण्याआधीचा सलमानचा प्रवास दबंग ३ मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सई मांजरेकर सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार असं म्हटलं जात आहे.
कॉफीपासून तयार करणार सनग्लासेस
तूर्त या गोष्टीला सईनं अधिकृत दुजारो दिलेला नाही. सईनं चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण पूर्ण केलं असल्याचं समजत आहे.