पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॅकस्टेज काम करणाऱ्यांसाठी मराठी कलाकारांचा मदतीचा हात

मराठी कलाकारांना मदतीचं आवाहन

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी चित्रपट, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे १९ पासून ते १४ एप्रिलपर्यंत मालिका, चित्रपट, जाहीरात, वेबसीरिज यांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद असणार आहे. नाटकाचे प्रयोगही रद्द झाले आहेत. यामुळे या क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्यांपुढे आर्थिक संकट उभं राहिलं आहे. 
हिंदी कलाकार आणि बॉलिवूडमधील अनेक संस्था पुढाकार घेऊन तिथे रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी मदत करत आहेत.  अभिनेता सुबोध भावे यानं देखील मराठी कलाकार आणि प्रेक्षकांना  नाट्य, चित्रपट आणि मालिकांच्या सेटवर रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. 

...म्हणून श्रीकृष्णाची भूमिका करण्यास टाळाटाळ करत होते नितीश भारद्वाज

'कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आलंय. प्रत्येकजण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतोय. लवकरच बाहेर पडूच. पण आपली मराठी कलाकार म्हणून वाटचाल सुरु असताना ह्या प्रवासात ज्यांनी पाणी आणून दिलं, जेवण वाढलं, चेहऱ्याला लागलेला रंग जपायला मदत केली, कपडे इस्त्री केले, सेटवर खिळे ठोकले, नाटकाची प्रॉपर्टी सांभाळली...थोडक्यात ज्यांचं त्यादिवशीच्या पैशांवर/पाकिटावर पोट भरत होतं, अशांना आपण मदतीचा हात द्यायचं ठरवलं आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या कलाकारांनी ह्या आपत्तीतही गरजवंताला हात द्यायचं ठरवलंय. तेव्हा जशी यथाशक्ती मदत केलीत अशा सगळ्या मराठी कलाकारांना पुन्हा एक आवाहन करतो आहोत. बँकस्टेज आर्टिस्ट, प्रॉपर्टी बॉइज, मेक अप सहाय्यक, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज, सेटिंग बॉइज, तंत्रज्ञ इत्यादी....  अशांना आपण काही दिवस पुरेल इतका शिधा आणि औषधं वगैरे इतर खर्चासाठी रोख रुपये १००० अशी मदत करण्याचे ठरवले आहे. आपण शक्य होईल तितका आपला सहभाग द्या, आणि ही मदत रंगमंच कामगार संघच्या खात्यात जमा करा असं आवाहन  रंगमंच कामगार संघच्या पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे.

२५ कोटी दान करण्याआधी पत्नी ट्विंकलनं अक्षयला विचारला होता एक प्रश्न

अभिनेता सुबोध भावेसह सुबोध भावे, सुशांत शेलार, विनोद सातव, प्रवीण तरडे  यांसारख्या सर्व कलांकारांनी सगळ्यांना पुढे येऊन मदतीचं आवाहन केलं आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus outbreak kalakaaar for maharashtra marathi star will help for theatre backstage people