पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्वा! शनिवारपासून दूरदर्शनवर 'रामायण' मालिकेचे पुनर्प्रक्षेपण

रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरूण गोविल आणि सीता ही भूमिका साकारणारी दीपिका.

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता घरी बसलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी, २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रचंड गाजलेल्या रामायण मालिकेचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली.

खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

रामायण मालिकेचा पहिला भाग शनिवारी सकाळी ९ वाजता आणि दुसरा भाग रात्री ९ वाजता दाखविण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. ९० च्या दशकात रामायण ही मालिका दूरचित्रवाहिनीवर खूप गाजली होती. रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेला तेव्हा संपूर्ण देशात मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी दर रविवारी सकाळी ही मालिका प्रसारित व्हायची. 

काही दिवसांपू्र्वीच या मालिकेत राम, लक्ष्मण आणि सीता या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार सोनी टीव्हीवरच्या द कपिल शर्मा शोमध्ये आले होते. तेव्हापासूनच ही मालिका परत दूरदर्शनवर दाखवावी, अशी मागणी पुढे आली होती. ती आता पूर्ण झाली आहे.

चीनलाही टाकलं मागे, अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

कोरोना विषाणूचे संक्रमण देशात वेगाने होते आहे. भारतात आतापर्यंत ७२४ जणांना या विषाणूची लागण झाली आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले अनेक रुग्ण आढळून आले आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus lockdown telecast of ramayana will be starting again on dd national from 28 march at 9 am