पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोनू सूदचा पुन्हा दिलदारपणा, ४५ हजार लोकांना देणार रोज जेवण

अभिनेता सोनू सूद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाविरोधातील या लढाईमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे करत जुहूमधील हॉटेल कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी दिलं. त्यानंतर आता सोनू सूदने आणखी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लॉकडाऊनमुळे दूरदर्शन ठरली सर्वाधिक पाहिली जाणारी वाहिनी

सोनू सूद त्याचे वडील शक्ती सागर सूद यांच्या नावावर एक योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत तो मुंबईत दररोज ४५ हजार नागरिकांना जेवण देणार आहे. सोनू सूदने या योजनेचे नाव 'शक्ती आनंदनम' असे ठेवले आहे. सोनूने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, 'सर्वांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी एकत्र आले पाहिजे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत तर कोणाकडे खाण्याची आणि जगण्याची सोय नाही. ही एक कठीण वेळ आहे. या लोकांच्या मदतीसाठी मी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे लोकांना जेवण दिले जाणार आहे.'

आर्थिक मदतीनंतर सलमानकडून रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मजुरांना धान्यपुरवठा

सोनू सूदप्रमाणेच अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षय कुमारने कोरोनाविरोधातील लढाईसाठी २८ कोटींची मदत केली. तर शाहरुख खानने त्याची कार्यालयीन इमारत ही क्वारंटाइन सोयीसाठी दिली. त्याचसोबत सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, आलिया भट, अनुष्का शर्मा, सनी देओल, करिश्मा कपूर, करीना कपूर यांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदत दिली आहे. 

प्रेक्षकांसाठी कपिल घरातून करणार 'द कपिल शर्मा शो'चं चित्रीकरण?

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus lockdown sonu sood distribute food to 45000 people daily under shaktin anandam scheme