पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमध्ये विराटच्या लूकसाठी अनुष्काने अशी घेतली मेहनत

अनुष्काने सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची परिस्थिती ओढावली आहे. खेळाची मैदान आणि बॉलिवूडचे काम सर्वच बंद असल्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली-अनुष्का शर्मा ही जोडीही लॉकऊनच्या दरम्यान घरात राहून सरकार आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे. सिलेब्स मोकळ्या वेळेत गंमतीशीर व्हिडिओ शेअर करुन आपल्या चाहत्यांचे मनोरंजन देखील करत आहेत.   

BCCI ने या फ्रेममधून दिले धोनीवरील प्रेम कमी झाल्याचे संकेत

क्रिकेटर शिखर धवनने शेअर केलेल्या भन्नाट व्हिडिओनंतर आता विराट-अनुष्का जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विराटसोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात ती चक्क विराट कोहलीचे केस कापताना दिसते. 
आगामी आयपीएलमध्ये क्रिकेटर्स अनोख्या आणि वेगळ्या हेअर स्टाइलसह दिसणार असल्याची चर्चा रंगली होती. कोरोनामुळे आयपीएल होणार की नाही यावर संभ्रम निर्माण झाला असला अनुष्काने शेअर केलेल्या व्हिडिओत विराट एका नव्या लूकमध्ये दिसला आहे. विशेष म्हणजे त्याची हेअर स्टाइलसाठी सर्व मेहनतही खुद्द अनुष्काने घेतल्याचे दिसते. 

COVID-19 अंतर ठेवायच म्हणजे त्यांना समाजातून आऊट करायचय नाही: सचिन

यापूर्वी अनुष्का-विराट जोडीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद द्या, असे आवाहन चाहत्यांना केले होते. त्या व्हिडिओला देखील चांगली पंसती मिळाली होती. घरात बसून आपल्याला कोरोनाविरोधातील सामना जिंकायचा आहे, असा संदेश विराटने दिला होता.  
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Meanwhile, in quarantine.. 💇🏻‍♂💁🏻‍♀

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on