पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधातील लढाईसाठी शिल्पा शेट्टीकडून २१ लाखांची मदत

शिल्पा शेट्टी

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. देशातही  मोठ्या वेगाने कोरोना परसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. अशात अनेक बॉलिवूड कलाकारांनी स्वखुशीने मदतीचा हात पुढे केला आहे. आपापल्यापरीने शक्य होईत तितकी मदत करण्याचा प्रयत्न ते करत आहे. आता बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील कोरोनाविरोधातील लढाईसाठी २१ लाखांची मदत केली आहे.

वायफळ खर्च टाळा, काटकसर करा, शरद पवार यांचा सल्ला

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ट्विट करत पीएम केअर फंडला २१ लाखांची मदत केली असल्याची माहिती दिली. या ट्विटमध्ये तिने सांगितले की, 'मी माझ्या परिने मदत केली आहे. आज एक छोटीशी मदत देखील खूप गरजेची आहे. प्रत्येकाने पुढे येऊन मदत करावी असे मी सर्वांना आवाहन करते. सगळ्यांनी मिळून या परिस्थितीचा मुकाबला करुया.', असे शिल्पा शेट्टीने सांगितले. 

'डॉक्टरांचे प्रेस्क्रिप्शन असलेल्यांना मद्य द्या'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाशी लढण्यासाठी देशातील जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी ट्विट करत देशातील जनतेने पीएम-केअर्स फंडात मदत करावी असे सांगितले. पंतप्रधानांच्या ट्विटनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे धावून आले. आतापर्यंत अक्षय कुमार, सनी देओल, वरुण धवन, कार्तिक आर्यन, सलमान खान, राजकुमार राव, कपिल शर्मा, अनुष्का शर्मा यांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी आर्थिक मदत केली आहे. अक्षय कुमारने सर्वात जास्त २५ कोटींची मदत केली आहे. 

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढणार का ? कॅबिनेट सचिव म्हणाले...