पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिलदार! अक्षय कुमारकडून बीएमसीला ३ कोटींची मदत

अक्षय कुमार

देशात कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ६ हजारांवर पोहचली आहे तर २०० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. अशात अनेक बॉलिवूड कलाकारांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने पीएम केअर्स फंडासाठी २५ कोटींची मदत केल्यानंतर आणखी मदत करण्यासाठी तो पुढे सरसावला आहे. अक्षयने मुंबई महानगरपालिकेला ३ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. 

अक्षय कुमारने ट्विट करत पोलिस, डॉक्टर, नर्स, पालिका कर्मचारी, एनजीओचे कर्मचारी, सरकारी कर्मचारी यासर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. अक्षय कुमारने या सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई कीट, सुरक्षित मास्क आणि टेस्टिंग किट्स मिळाव्यात यासाठी ३ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. आतापर्यंत अक्षय कुमारने कोरोनाविरोधातील लढाईसाठी सरकारला २८ कोटींची मदत केली आहे. अक्षय कुमारने मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे कौतुक केले आहे.