कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रसिद्ध गायिका कनिका कपूरच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण तिचा तिसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला असून तिला यातून बाहेर पडण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कोरोना : जयंत पाटलांच्या शहरात नवी नियमावली लागू होणार
पीजीआय विभागाचे प्रमुख डॉ. आरके सिंह यांच्या आदेशानंर कनिका कपूरचे नमुने तिसऱ्यांदा तपासण्यात आले होते. हे रिपोर्ट पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आले आहेत. कनिका कपूर सोबत आणखी एका रुग्णाचे नमने तपासण्यात आले होते. या रुग्णाचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. याशिवाय 10 पेक्षा अधिक लोकांनी कोरोनाची लक्षणं दिसत असल्यामुळे तपासणीसाठी रुग्णालयात आले होते. या लोकांना घरीच क्वॉरंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे.
पुण्यातील शास्त्रज्ञांनी टिपली जीवघेण्या कोरोनाची प्रतिमा
यापूर्वी कनिकाची 24 मार्च रोजी दुसरी टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. कनिका कपूरवर विशेष वार्डात उपचार सुरु असून तिचा प्रादुर्भाव इतरांना होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. कनिका 11 मार्चला लंडनहून लखनऊमध्ये परतली होती. त्यानंतर 13, 14 आणि 15 मार्चला केंद्र सरकारच्या आदेशाला झुगारुन कनिका होळीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. ती जवळपास 250 ते 300 लोकांच्या संपर्कात आली होती. यात नेतेमंडळींचाही सहभाग होता.