आयुष्मान खुरानाचा 'ड्रिम गर्ल'सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. दोन आठवड्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातलं 'ढगाला लागली कळ' हे गाणं सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेलं हे गाणं स्वामित्त्वाच्या हक्कांवरून वादात सापडलं आहे. हे गाणं डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचा आदेश दिल्ली हायकोर्टानं दिला आहे.
अनुष्का शर्मा 'फॉर्च्यून इंडिया'च्या प्रभावशाली महिलांच्या यादीत
दादा कोंडके यांचं प्रसिद्ध 'ढगाला लागली कळ' या गाण्याला रिमिक्सचा तडका देऊन ते 'ड्रिम गर्ल'मध्ये वापरण्यात आलं होतं. या गाण्यात रितेश देशमुख पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत होता. यापूर्वी मूळ 'ढगाला लागली कळ' या गाण्यातील कोणताही भाग वापरण्यास बालाजी मोशन पिक्चरला हायकोर्टानं मनाई केली होती.
तरीदेखील हे गाणं चित्रपटाच्या प्रसिद्धीकरता वापरण्यात आलं. त्यामुळे स्वामित्त्वाच्या हक्काचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे गाणं सर्व सोशल मीडिया साइटवरून काढून टाकण्याचा आदेश कोर्टानं दिला आहे.
रणवीर सिंगच्या 'गल्ली बॉय' चित्रपटाची ऑस्कर वारी
'ड्रिम गर्ल' हा चित्रपट दोन आठवड्यापूर्वी देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं एकूण ९७.६५ कोटींची कमाई केली आहे.