पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : अभिजित बिचुकलेंविरोधातील तक्रार मागे

अभिजित बिचुकले

 साताऱ्याचे नेते आणि बिग बॉस मराठी २ मधले स्पर्धक अभिजित बिचुकले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खंडणीप्रकरणातील त्यांच्याविरोधातील तक्रार फिर्यादीनं स्वत:हून मागे घेतली आहे. त्यामुळे आता अभिजित बिचुकले शोमध्ये परतण्याची शक्यता वाढली आहे.

चेक बाऊन्स प्रकरणी अभिजित बिचुकलेंना गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या सेटवरून अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी  त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. चेक बाऊन्स प्रकरणी त्यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला मात्र खंडणीप्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती पण आता त्यांच्याविरोधातील तक्रार फिर्यादीनं मागे घेतली असल्याचं एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. 

बिग बॉस मराठी २ : शिव्या देण्यापासून बिचुकलेंना थांबवलं नाही कारण...

माझी अभिजित बिचुकलेंविरोधात कोणतीही तक्रार नाही असं  फिर्यादीनं स्वत:हून न्यायालयात लिहून दिल्यानं बिचुकलेंना मोठा दिलासा मिळाला  आहे. फिर्यादीनं तक्रार मागे घेतल्यानं ते शोमध्ये परतणार का? हे पाहण्यासारखं ठरेन. बिग बॉस मराठी सिझन २ मधले वादग्रस्त स्पर्धक म्हणून ते ओळखले जातात.  गेल्याच आठवड्यातील एका टास्कदरम्यान त्यांनी सहस्पर्धक रुपाली भोसले हिला अश्लील शब्दात शिवीगाळ केली होती.  त्यामुळे त्यांनी सर्वांचाच रोष ओढावून घेतला होता. भाजपची माजी नगरसेविक रितू तावडे यांनी बिचुकलेंना शोमधून काढून टाकावे अशी मागणी केली होती. दरम्यान मी हा शो जिंकून नये म्हणून मला अटक करण्याचा हा राजकीय कट असल्याचा आरोप बिचुकलेंनी केला होता.