पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वरुण धवनला घरासमोर महिलेची धमकी, पोलिसांत गुन्हा दाखल

अभिनेता वरुण धवन आणि त्याची मैत्रिण नताशा दलाल

अभिनेता वरुण धवन आणि त्याच्या कुटुंबियांची बदनामी करणे, त्याचबरोबर त्याच्या घरासमोर आत्महत्या करण्याची धमकी देण्याच्या मुद्द्यावरून मुंबई पोलिसांनी एका महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ५०४ (जाणीवपूर्वक एखाद्याची बदनामी करणे आणि शांततेचा भंग करणे) आणि ५०६ (गुन्हा करण्यास उद्युक्त करणे) या दोन्हींखाली संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना डांगे असे या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अर्चना डांगे या जुहू तारा रस्त्यावरील वरुण धवन याच्या निवासस्थानी गेल्या. त्यांनी बंगल्याच्या बाहेरच वरुण धवन याची वाट पाहिली. त्याला बघितल्यावर अर्चना डांगे यांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांबद्दलही अपशब्द वापरले. वरुण धवनची मैत्रिण नताशा दलाल हिच्यावर हल्ला करण्याची त्याचबरोबर स्वतःही आत्महत्या करण्याची धमकी तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वरुण धवन अर्चना डांगे यांना ओळखत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 'हिंदूस्थान टाइम्स'ने वरुण धवनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याने प्रतिसाद दिला नाही.
वरुण धवन सध्या त्याचा आगामी सिनेमा कलंकच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. येत्या १७ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमामध्ये मोठी स्टारकास्ट असून त्यामध्ये अलिया भट, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांचा समावेश आहे. 

करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे. आतापर्यंत कलंकच्या प्रदर्शित झालेल्या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.