पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कपिल शर्मा शोमध्ये परतणार? सुनील म्हणतो...

सुनील ग्रोवर

कॉमेडियन कपिल शर्मा आणि  सुनील ग्रोवर या दोघांमधला वाद हा सर्वश्रुत आहे. कपिल आणि सुनील ही छोट्यापड्यावरची एकेकाळची सुपरहिट जोडी होती. मात्र आता दोघांमधला विस्तव काही केल्या जात नाही. तरीही या जोडीनं वाद मिटवून पुन्हा एकत्र यावं  अशी तमाम चाहत्यांची इच्छा आहे. 

त्यातच सुनीलनं एक ट्विट करून सर्वांनाच कोड्यात टाकलं होतं. हे ट्विट पाहून सुनील आणि कपिल दोघंही एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उढाण आलं. मात्र या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं सुनीलनं स्पष्ट केलं आहे. 

हॉलिवूड दिग्दर्शकाच्या सेटसमोर भारतीयाचा आत्महत्येचा प्रयत्न

'माझ्या ट्विटवरून  लोकांनी हा अर्थ का लावला हेच मला समजत नाही. असे तर्क विर्तक मांडणं कधीकधी खूपच त्रासदायक असतात. मी कपिल शर्मा शोमध्ये परतत नाही. येत्या काळात मी एक वेगळी संकल्पना घेऊन येत आहे. लवकरच त्याचा उलगडा होईल.' असं सुनीलनं सांगितलं.

सुनील शर्मा लवकरच वेबसीरिजमध्ये दिसणार अशा चर्चा आहेत. मार्च २०१७ मध्ये कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाला होता तेव्हापासून तो या शोचा भाग नाही.

शिल्पाच्या तथ्यहिन आरोपांकडे लक्ष द्यायला वेळ नाही- सिंटा