पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेत्री उषा जाधवनं मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार

उषा जाधवनं मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार

नुकत्याच पार पडलेल्या 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेत्री उषा जाधवचा  सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून गौरव करण्यात आला. बॉलिवूडचे महानायक बच्चन यांनी उषा जाधवचा फोटो शेअर करत तिचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उषाच्या यशाबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. 

मराठी अभिनेत्री उषा जाधवसोबत काम केल्याचा बिग बींना अभिमान

उषानं यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे  हे नेहमीच  कलाकारांच्या मागे उभे राहून त्यांना प्रोत्साहन देतात,  त्यांच्या अभिनयामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. मी राज्याची शान कायमच उंच ठेवीन, असं म्हणत उषा जाधव हिनं  उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. 

उषाला माई घाट : क्राईम नंबर १०३/२००५ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं इफ्फीमध्ये  गौरवण्यात आलं. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील उषाचे आभार मानले आहेत. 

आमिर खान दर्शनासाठी सूवर्णमंदिरात