पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉक्स ऑफिसवर जानेवारीत रंगणार दीपिका विरुद्ध अजय आणि रजनीकांत यांचं महायुद्ध

बॉक्स ऑफिसवर टक्कर

चित्रपट प्रेमींसाठी नव्या वर्षाचा पहिला महिना हा खऱ्या अर्थानं खास ठरणार आहे.  कारण जानेवारी महिन्यात अनेक मोठ्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवशी सुपरस्टार रजनीकांत, दीपिका पादुकोन आणि अजय- काजोल- सैफ या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होत आहे.  १० जानेवारीला तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होत असल्यानं  या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा सामना रंगणार हे नक्की. 

स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित होत आहे.  अजय देवगन, काजोल, सैफ अली खान, शरद केळकरसह अनेक कलाकारांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षकांसाठी हा चित्रपट हिंदीबरोबरच मराठीतही प्रदर्शित होत आहे. अजय देवगनचा  त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीतला हा १०० वा चित्रपट आहे त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट नक्कीच खास असणार आहे.

स्मृतीदिन विशेष : मराठी सिने-नाट्यसृष्टीतील 'विनोदाचा बादशहा'

 याच दिवशी अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या संघर्षावर आधारित 'छपाक' चित्रपटही प्रदर्शित होत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोन प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटातून ती निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर जगभरातून दीपिकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा चित्रपट देखील १० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. 

दीपिकाच्या पदरात दुसरा हॉलिवूड चित्रपट?

महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही चित्रपटांसमोर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'दरबार' या चित्रपटाचं प्रमुख आवाहन असणार आहे. रजनीकांत यांचा केवळ दक्षिणेतच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे, त्यातून रजनीकांत यांचे चित्रपट हमखास प्रेक्षकांकडे गर्दीला खेचून घेतात हे जणू समीकरणच आहे. विशेष म्हणजे तेलगू, तामिळ व्यतिरिक्त हिंदीत देखील हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल, नियामक मंडळाकडून अधिकृत घोषणा

अनेकदा बॉक्स ऑफिसवर मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यानं चित्रपटांच्या कमाईवर याचा परिणाम होतो, अशावेळी निर्माते सुवर्णमध्य काढत चित्रपटाच्या तारखा बदलतात अशी अनेक उदाहरणं बॉलिवूडमध्ये आहेत, मात्र तिन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांकडून असा कोणताही निर्णय झाला नसल्यानं पुढील वर्षी हे तिन्ही चित्रपटत बॉक्स ऑफिसवर एकमेकांना धडकणार हे नक्की.