पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिल्पाच्या तथ्यहिन आरोपांकडे लक्ष द्यायला वेळ नाही- सिंटा

शिल्पा शिंदे

सिने आणि टेलिव्हिजन आर्टिस्ट असोशिएशन (सिंटा)मुळे मला काम मिळत नाही असा आरोप अभिनेत्री शिल्पा शिंदेनं नुकताच केला होता. हे आरोप सिंटानं तथ्यहिन ठरवले आहेत.  एखाद्या कलाकाराकडे लक्ष देऊन त्याचं करिअर जाणीवपूर्वक नष्ट करण्याइतका वेळ आमच्याकडे नाही, असा खोचक टोलाही सिंटानं लगावला आहे. 

जोडीदाराची खिल्ली उडवणाऱ्या नेटकऱ्यांना नेहाचं सडेतोड उत्तर

एखाद्या अभिनेता- अभिनेत्रीचं करिअर संपवणे आणि त्यासाठी वेळ वाया घालवणाऱ्यांपैकी सिंटा नाही. आमची संस्था कलाकारांना मदत करणारी संस्था आहे. शिल्पा सिंटाची सदस्यही नाही. शिल्पानं  आपल्याच संस्थेवर टीका केली होती. जर एखाद्या कलाकाराला कामच मिळवून द्यायचं नसेन तर त्यात निर्मात्यांच्या संस्थेचा हात असू शकतो. आमची संस्था त्यातली नाही, अशी प्रतिक्रिया सिंटानं स्पॉट बॉय इशी बोलताना दिली आहे. 

चांगले चित्रपट नेहमी स्टारकिड्ससाठीच, अभिनेत्रीची खंत

शिल्पाला सिंटाकडून मदतीची अपेक्षा असेन तर तिनं वापरेल्या अपशब्दांबद्दल समितीची माफी मागावी, असंही सिंटानं म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रसिद्धी झोतापासून लांब असलेल्या शिल्पानं सिंटामुळे आपल्याला चांगलं काम मिळत नसल्याचा आरोप केला होता.