पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जितेंद्रनं लिहिले गाणे, अमृताचा 'अल्बम.. ' हिट

अमृता खानविलकर

जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, क्षिती जोग, अनिकेत विश्वासराव असा मल्टी स्टारर मराठी चित्रपट 'चोरीचा मामला'  या महिन्याअखेरीस प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे टीझर सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातल आहेत. अशातच चित्रपटातलं  'अल्बम काढाल काय' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. सध्या या गाण्याची सोशल मीडियावर 'हवा' आहे.

'मलंग'मध्ये अमृता खानविलकरदेखील, भूमिकेसाठी तब्बल १२ किलो वजन केलं कमी

अतिशय ग्लॅमरस आणि हॉट लुकमध्ये अमृता खानविलकरनं या गाण्यावर ठुमके लगावले आहेत. गायिका शाल्मली खोलगडेनं "अल्बम काढाल काय" हे गाणं गायलं आहे. जितेंद्र जोशीनं लिहिलेलं हे गाणं संगीतकार चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलं आहे. उडती चाल आणि ढिनचॅक शब्द, अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लूक हे या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. सुजीतकुमार गाण्याचे कोरिओग्राफर आहेत. अल्पावधीतच या गाण्याला सोशल मीडियात मोठी लोकप्रियता मिळाली आहे. 

'नवऱ्याच्या घटस्फोटाबद्दल कशाला बोलता, मी तरी कुठे व्हर्जिन आहे'

प्रियदर्शन जाधव लिहित आणि दिग्दर्शित हा चित्रपट ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.