पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'संकटकाळी शिवरायांचे स्मरण करतो'

चिन्मय मांडलेकर

अभिनेता चिन्मय मांडलेकर पुढील आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या 'फत्तेशिकस्त' या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. आयुष्यात महाराजांची भूमिका साकारण्याचं शिवधनुष्य एकदा तरी उचलावं अशी इच्छा अनेक कलाकारांची असते. मात्र हे भाग्य क्वचितच एखाद्या अभिनेत्याला लाभतं. चिन्मय तो सुदैवी कलाकार आहे. महाराजांची भूमिका साकारण्याची संधी लाभली यासाठी चिन्मय स्वत:ला भाग्यशाली समजतो. 

फत्तेशिकस्त! स्वराज्याच्या शत्रूवर महाराजांचा सर्जिकल स्ट्राइक

पहिलीत असताना पहिल्यांदा महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहिल्याची आठवण चिन्मयनं  हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितली.  पहिलीत असताना आमच्या संपूर्ण वर्गाला 'बाल शिवाजी' चित्रपट पाहायला नेलं होतं. महाराजांची ती अफाट बुद्धी, त्यांचे शौर्य, पराक्रमाची छाप त्यावेळी बालमनावर कोरली गेल्याची आठवण  चिन्मयनं सांगितली. 

महिला केंद्रीत चित्रपटासाठी पैसे मिळवण्यात अडचणी, जॉनची खंत

छत्रपती शिवाजी महाराज माझे आदर्श आहेत. संकटकाळी  मी महाराजांचं स्मरण करतो, महाराजांच्या स्मरणामुळे ताकद मिळते, संकटातून मार्ग काढताना मदत होते असं चिन्मय म्हणाला. एखाद्या कठीण प्रसंगी महाराजांनी कसा मार्ग काढला असेल याचं नेहमीच स्मरण करतो. त्यांच्या विचारांमुळे खूप काही शिकायला मिळते असंही चिन्मयनं सांगितलं. 

केबीसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, नेटकऱ्यांचा संताप

फार कमी वयात महाराजांविषयी वाचायला सुरूवात केली. श्रीमान योगी, राजा शिवछत्रपती अशी महाराजांविषयी पुस्तकं शाळेत असतानाच वाचली होती असंही चिन्मय म्हणाला. चिन्मयसह अनेक मराठी कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला 'फत्तेशिकस्त' चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.