पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बी म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज शब्द नाही तर मंत्र आहेत

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी महाराजांना वंदन केले. बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवर एका पोस्ट शेअर केली आहे. 

दीपिकाचा '८३' मधला पहिला लूक प्रदर्शित

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शब्द नाहीत तर ते  मंत्र आहेत. महाराजांकडून आपल्याला  आजही प्रेरणा मिळत आहे. ते जगातले एक श्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजा  होते, त्यांचं स्मरण हे नेहमीच प्रेरणादायी राहिलं आहे असं ट्विट करत बच्चन यांनी महाराजांना वंदन केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगननं देखील महाराजांना वंदन केले आहे. शाळेत असल्यापासून महाराज माझ्यासाठी श्रद्धास्थानी आहेत. तान्हाजी द  अनसंग वॉरियर या चित्रपटाची निर्मिती करत असताना मला पुन्हा एकदा  महाराजांच्या पराक्रमाचा परिचय झाला,  भारताच्या या शूर पुत्राला कोटी कोटी प्रणाम असं अजयनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

मृत्यूशी झुंज देणाऱ्या अमर सिंह यांनी अमिताभ बच्चन यांची मागितली माफी