पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'छपाक' चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली ५ कोटींची कमाई

छपाक

अभिनेत्री दिपिका पदुकोनच्या छपाक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पहिल्याच दिवशी छपाकने ५ कोटींची कमाई केली आहे. ट्रेड विश्लेषक रमेशा बाला यांच्या अहवालानुसार पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात ५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

युक्रेनचे विमान चुकून पाडले; इराणी सैन्यांची कबुली

ट्रेन विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'छपाक'ने बॉक्स ऑफिस ५ कोटींची कमाई केली आहे. छपाक चित्रपट पहिल्या दिवशी सुमारे ४-५ कोटींची कमाई करेल असे अपेक्षा ठेवली होती. या आठवड्याच्या शेवटपर्यंत छपाकची कमाई आणखी वाढेल असे त्यांनी सांगितले.

गायी-म्हशीच्या दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी होणार वाढ 

छपाक चित्रपटासोबत १० जानेवारीला अजय देवगनचा तानाजी: अनसंग वॉरियर हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला. तानाजी चित्रपटाने पहिल्याच दिवशी १६ कोटींची कमाई केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे छपाक चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटामध्ये दीपिकासोबत विक्रांत मस्सी मुख्य भूमिकेत आहे.

बस-ट्रकच्या अपघातानंतर भीषण आग; २० जणांचा मृत्यू