पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तेव्हा लोकांना माझा विद्रुप चेहरा पहायचा नव्हता आणि आता.....'

लक्ष्मी अग्रवाल

नुकताच दीपिका पादुकोनची प्रमुख भूमिका असलेल्या 'छपाक'चा ट्रेलर प्रदर्शित झाला.  चित्रपटाचा ट्रेलर पाहून लोकांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. लक्ष्मी अग्रवाल या  अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या संघर्षमय जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. दीपिका यात लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे लक्ष्मीही खूप खूष आहे. 

'एक वेळ होती की लोकांना माझा चेहराही पहायचा नव्हता. त्यांना माझी भीती वाटायची मात्र आता ते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मी देखील तितकीच उत्सुक आणि आनंदी आहे', असं लक्ष्मी म्हणाली. 

अक्षयनं पत्नीला भेट दिले कांद्याचे झुमके

दीपिका आणि मी अगदी सारखे दिसतोय असंही माझ्या जवळच्या मित्र मैत्रीणींनी मला सांगितलं. चित्रपटात दिसणारी ती मुलगी मी आहे का असंही अनेकांनी मला विचारलं. हा चित्रपट माझ्यासाठी आणि अनेक अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी  महत्त्वाचा आहे. प्रतिशोध घेण्याची लोकांची चुकीची मानसिकता या चित्रपटातून नक्की बदलेल. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांविषयी जनजागृती करण्याचं काम  नक्कीच हा चित्रपट करेल असाही विश्वास लक्ष्मीनं व्यक्त केला आहे. 

प्रमोशनमधून वेळ काढत मेकअप मनच्या मुलाच्या लग्नात सलमानची उपस्थिती

एक काळ होता तेव्हा लोकांना माझा विद्रुप चेहरा पाहायचा नव्हता. मात्र आता लोक माझ्यासोबत फोटो काढत आहेत. लोकांचा दृष्टीकोन बदलत आहे, आमच्याशी त्यांना मैत्री करायची आहे, लग्न करायचं आहे. लोकांना आमची गोष्ट आमचं दुख: ऐकायचं आहे यापेक्षा चांगला बदल तो कोणता असंही लक्ष्मी म्हणाली.