पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छपाकच्या श्रेयनामावलीत अपर्णा भट्ट यांना योग्य स्थान द्या - कोर्ट

छपाकमधील एक दृश्य

दिल्लीतील न्यायालयाने छपाक सिनेमाच्या श्रेयनामावलीत वकील अपर्णा भट्ट यांना योग्य ते स्थान देण्याचे आदेश या सिनेमाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांना दिले आहेत. वरिष्ठ अतिरिक्त न्यायाधीश डॉ. पंकज शर्मा यांच्या न्यायालयाने हे आदेश दिले. हा सिनेमा शुक्रवारी देशभरात प्रदर्शित होतो आहे. ऍसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी आगरवाल हिच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. लक्ष्मी आगरवाल यांची बाजू न्यायालयात मांडण्याचे काम अपर्णा भट्ट यांनी केले होते. 

भाजप-मनसे यांच्यातील युतीसंदर्भात फडणवीस म्हणाले की,...

सिनेमामध्ये आपले नाव न घातल्याने नाराज झालेल्या अपर्णा भट्ट यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने लक्ष्मी आगरवाल यांना न्याय मिळवून देण्यात अपर्णा भट्ट यांनी जी भूमिका निभावली आहे. त्याला योग्य प्रसिद्धी सिनेमात मिळाली नसल्याच्या त्यांच्या दाव्यात तथ्य असल्याचे म्हटले. त्यांच्या योगदानाची योग्य दखल सिनेमात घेतली जाण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

निर्भया प्रकरण: विनयने सुप्रीम कोर्टात दाखल केली क्युरेटिव्ह पिटिशन

मी गेल्या कित्येक वर्षांपासून कायदेशीर बाबीमध्ये लक्ष्मीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. मात्र चित्रपटाच्या श्रेयानामावलीत नावाचा उल्लेखही नाही, असा आरोप अपर्णांचा होता, त्यामुळे त्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पतियाळा न्यायालयाने हा निकाल दिला आहे.