पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गुलाबो..' मुळे बच्चन- इमरान हाश्मीच्या 'चेहरे'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली

चेहरे

'गुलाबो सिताबो'मुळे अमिताभ बच्चन- इमरान हाश्मी यांच्या  'चेहरे' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. 'गुलाबो सिताबो' आणि  'चेहरे' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजे २४ एप्रिलला प्रदर्शित होणार होते.  'गुलाबो सिताबो' च्या निर्मात्यांच्या विनंतीवरून 'चेहरे'च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता 'चेहरे' १७ जुलैला प्रदर्शित होणार आहे तर 'गुलाबो सिताबो' २४ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Video : नागराज मंजुळे- बिग बींच्या 'झुंड'शी ओळख झाली का?

'चेहरे' आणि 'गुलाबो सिताबो' या दोन्ही चित्रपटात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे. 'चेहरे' मध्ये अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी ही जोडी दिसणार आहे तर 'गुलाबो सिताबो'मध्ये बच्चन यांच्या जोडीला आयुष्मान खुराना आहे. विशेष म्हणजे दोन्ही कलाकार बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करत आहेत. 

' TikTok' व्हिडिओमधून भावना दुखावल्याबद्दल दीपिकानं माफी मागावी- कंगना

'चेहरे' हा एका थ्रीलर मुव्ही असून या चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण हे परदेशात झालं आहे. या चित्रपटातील पहिला लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला.