पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली', चला हवा येऊ द्या वादात

निलेश साबळे

झी मराठी वाहिनीवरील तुफान लोकप्रिय असलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा  वादात सापडला आहे. या कार्यक्रमात छत्रपती  शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचे फोटो एडिट करुन त्याजागी  भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या विनोदवीरांचे फोटो महाराजांच्या प्रतिमारुपात दाखवण्यात आले आहेत, त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’ च्या  संपूर्ण टीमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी निलेश साबळे आणि  झी मराठी वाहिनी माफी मागावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी  केली आहे.

तुझ्या प्रेमाची लागली हळद, पराग कान्हेरे अडकला लग्नबंधनात

'लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. चला हवा येऊ द्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्हसुद्धा आहे. निलेश साबळे तसेच झी वाहिनीने या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.', असं  छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी  म्हटलं आहे.
'आमचे घराणे हे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरी मध्ये रूपांतरित केले होते.

मुंबई, पुण्यातील जीम, स्विमिंग पूल, थिएटर बंद करण्याचा निर्णय

सयाजीराव गायकवाडांचे योगदान ही काही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची आणि पोषक वातावरणाची गरज असते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करावं. आम्हा सर्व इतिहास प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.' असं छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

कोरोनामुळे १०० वे नाट्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय