पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तान्हाजी'च्या दिग्दर्शकाला जितेंद्र आव्हाडांचा धमकीवजा इशारा

'तान्हाजी : द अनसंग वॉरियर'

ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाचा  ट्रेलर दोन दिवसांपूर्वीच  प्रदर्शित झाला. हा चित्रपट स्वराज्याचे सुभेदार तान्हाजी मालुसरे  यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला  चांगला प्रतिसाद लाभला आहे. मात्र राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटाच्या ट्रेलरवर आक्षेप नोंदवला आहे. या चित्रपटातील काही प्रसंगात अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी दाखवल्या असल्याचं आव्हाडांचं म्हणणं आहे त्यात बदल न केल्यास 'माझ्या पद्धतीने लक्ष घालेन'  असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला आहे. 

लता मंगेशकर यांची प्रकृती ठिक, भाची रचना शहा यांची माहिती

ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील काही दृष्यांवर तसेच संवादांवर संभाजी ब्रिगेडनेही आक्षेप नोंदवला होता. हा वाद सुरू असताना आव्हाडांनी देखील ट्विट करत आक्षेप नोंदवला आहे. 'ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला , त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल. याला धमकी समजली तरी चालेल' असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. 

आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार नागार्जुनही

या चित्रपटात काजोलच्या तोंडी असलेल्या संवादावरही आव्हाडांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटात काजोल तान्हाजी मालुसरेंच्या पत्नी सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहेत.  'जब शिवाजीराजे की  तलवार चलती है तब औरतो का घुंघट और ब्राह्मणोका जनेऊ सलामत रहता है' असं वाक्य काजोलच्या तोंडी आहे, यावर आव्हांडाचा आक्षेप आहे.

'शिवाजी महाराजांनी कधीही  महिलांना घुंघटमध्ये ठेवलं  नाही. याउलट त्यांनी सती जात असलेल्या जिजाऊंना थांबवलं होतं. महाराजांच्या दररोजच्या मसलतीत  स्त्रियांचाही सहभाग असयचा. शिवाजी महाराजांची तलवार ही केवळ एका समाजाचं रक्षण करण्यासाठी नव्हती. ते सर्व जात, धर्म पंतांच्या लोकांचं रक्षण करायचे असंही आव्हाड म्हणाले. त्यामुळे चित्रपटातील काही बदल तातडीनं करण्याची सूचना ओम राऊत यांना त्यांनी दिली आहे. 

अमिताभ बच्चन यांच्या 'चेहरे'मधून कृति खरबंदा बाहेर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:certain inaccuracies in Tanhaji The Unsung Warrior Jitendra Awhad asked director to changed immediately