पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेत्री ईशा गुप्ताविरोधात व्यावसायिकाची बदनामीची तक्रार

ईशा गुप्ता

दिल्लीस्थित व्यावसायिकानं अभिनेत्री ईशा गुप्ताविरोधात दिल्ली कोर्टात बदनामीची तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री ईशानं या व्यावसायिकावर  लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. त्यानंतर व्यावसायिक रोहित विगनं तिच्याविरोधात साकेत न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. 
ईशानं त्याच्याविरोधात चुकीचं ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे मला प्रचंड मनस्ताप झाला असून नातेवाईक आणि मित्रपरिवारानं याबद्दल नाराजी दर्शवली आहे. या ट्विटद्वारे माझी प्रतिमा मलिन करण्यात आली आहे असंही संबधित व्यक्तीनं  म्हटलं आहे. 

या महिन्याच्या सुरूवातीला ईशानं काही ट्विट् केले होते.  ज्यात तिनं संबधित व्यक्ती घाणेरड्या नजरेनं आपल्याकडे पाहत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ईशानं रोहितचा फोटो ट्विट केला होता. ' महिलेकडे वाईट नजरेनं पाहणं हे योग्य असल्याचं हा इसम मानतो. या व्यक्तीनं मला स्पर्श केला नाही किंवा माझ्यावर अश्लिल शेरेबाजी केली नाही मात्र तो माझ्याकडे वाईट नजरेनं पाहत होता. महिला अजूनही असुरक्षितच आहे, स्त्रीच्या जन्माला येणं खरंच पाप आहे का?' असं तिनं या ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

ईशासोबत आपण कोणतंही गैरवर्तन केलं नाही, मात्र तिनं माझी प्रतिमा मलीन करण्यचा प्रयत्न केला असं रोहितनं तक्रारीत म्हटलं आहे.