पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या दिवशी येणार बंटी- बबली प्रेक्षकांच्या भेटीला

बंटी और बबली २

सैफ अली खान आणि राणी मुखर्जी ही रुपेरी पडद्यावरची हिट जोडी तब्बल ११ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहे. 'बंटी और बबली २' मध्ये ही जोडी एकत्र दिसणार आहे.. 'हम तुम', 'ता रा रम पम' आणि 'थोडा प्यार थोडा मॅजिक' या चित्रपटानंतर या जोडीला रुपेरी पडद्यावर पाहता  येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली. २६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात राणी- सैफबरोबर 'गली बॉय' फेम सिद्धार्थ चुतर्वेदी आणि नवोदित अभिनेत्री शरवरीदेखील मुख्य भूमिकेत आहेत. 

प्रेम...आहे, नाही, बहुतेक, वगैरे... विचार करायला लावणारा 'मन फकीरा'

राणी- अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेला 'बंटी- बबली' चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. चित्रपटाची कथा, गाणी इतकंच नाही तर 'बंटी- बबली' पासून प्रेरित कपड्यांची नवी फॅशनही त्यावेळी बाजारात पहायला मिळाली होती. या चित्रपटाची तुफान क्रेझ होती.  राणी- अभिषेकची जोडी तर पडद्यावरची हिट जोडी ठरली होती.  या चित्रपटाचा पुढचा भाग येत आहे. अर्थात या चित्रपटासाठी  राणी- अभिषेक या जुन्या जोडीला विचारण्यात आलं होतं. मात्र  काही गोष्टी जुळून आल्या नाही. तेव्हा अभिषेक बच्चन राणीसोबत चित्रपटात दिसणार नाही मात्र त्याजागी सैफची वर्णी लागली आहे. 

हुंड्यासाठी सासरकडून छळ, गायिकेची आत्महत्या

येत्या काही महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे  त्यामुळे प्रेक्षकांना देखील चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.