पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टायगरची डरकाळी कोरोनावर भारी !

बागी ३

एकीकडे कोरोना विषाणूचा फटका मनोरंजन विश्वाला मोठ्या प्रमाणात  बसला असताना  टायगर श्रॉफचा 'बागी ३' मात्र बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. 

कोरोनामुळे 'सूर्यवंशी', '८३' सारख्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता आहे. आयफासारखा मोठा अवॉर्ड शो रद्द झाला आहे. कान फिल्म फेस्टिव्हलही रद्द होण्याच्या मार्गावर आहे. बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांचं चित्रीकरण रद्द करण्यात आलं आहे. मनोरंजन विश्वाला कोरोनाचा फटका बसला असताना टायगरचा 'बागी ३' मात्र तुफान चालतोय.

PHOTOS : दीपिकाच्या हॉट लूकनं चाहतेही घायाळ

सलग दुसऱ्या आठवड्यातही 'बागी ३' नं चांगली कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार 'बागी ३' नं ८४.९७ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या घरात पोहोचेल.  होळी आणि धुलिवंदनचा  फायदा या चित्रपटाला झाला आहे.

कोरोना विषाणूमुळे कान फिल्म फेस्टिव्हल रद्द होण्याची शक्यता

अनेक ठिकाणी  कोरोनामुळे चित्रपटगृहात शुकशुकाट आहे  मात्र 'बागी ३' ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, रितेश देशमुख  आणि अंकिता लोखंडे या प्रमुख भूमिका 'बागी ३' मध्ये आहेत. 

हॉलिवूड अभिनेते टॉम हँक्स आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण