पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Mission Mangal vs Saaho : प्रभास आणि अक्षयमध्ये टक्कर अटळ

अक्षय कुमार प्रभास

सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करून अधिक नफा  कमवायचा असा फंडा निर्मात्यांचा असतो. सुट्टीच्या दिवशी प्रेक्षकांची चांगली गर्दी चित्रपटगृहात जमते आणि चित्रपटाची  कमाईही चांगली होते. हे वर्षानुवर्षे चालत आलेलं समिकरण आहे. येत्या १५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मात्र दोन मोठ्या सुपरस्टार्सची टक्कर पहायला मिळणार आहे. कारण १५ ऑगस्टला  अक्षय कुमार आणि प्रभासचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

'मिशन मंगल'मध्ये अक्षयची भूमिका केवळ २५ मिनिटांची?

नुकतीचं अक्षय कुमार, शरमन जोशी, तापसी पन्नू, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मिशन मंगल' चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. याच दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टर प्रभासचा 'साहो' हा चित्रपटदेखील हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत  प्रदर्शित होत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर प्रभास आणि अक्षय कुमारची टक्कर ही अटळ असणार आहे. 

अक्षय कुमारचा महिन्याचा खर्च फक्त .....

याव्यतिरिक्त जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' देखील  १५ ऑगस्टलाच प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आता मायबाप प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला जास्त पसंती देतात हे पाहण्यासारखं ठरेन.