पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मिस्टर इंडिया'चा रिमेक येणारच- बोनी कपूर

मिस्टर इंडिया

गेल्या काही वर्षांपासून 'मिस्टर इंडिया'चा रिमेक किंवा सीक्वल येणार असल्याच्या चर्चा होत्या. पण श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर या चर्चा तिथेच थांबल्या. आता 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट नव्या रूपात  प्रेक्षकांना लवकरच पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. या वृत्ताला निर्माते  बोनी कपूर यांनी दुजोरा दिला आहे. 

'सुरूवातीला या चित्रपटाचा रिमेक होईल त्यानंतर चित्रपटाचे पुढील भाग येतील. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे. चित्रीकरणाला कधी सुरूवात होईल हे सांगता येत नाही. मात्र लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईन,' असं ते  मिड डेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

 'मिस्टर इंडिया' मुळे श्रीदेवी आणि अनिल कपूर यांची प्रेक्षकांच्या मनातील प्रतिमा  पूर्णपणे बदलली. आधीच्या काळात श्रीदेवीकडे सगळेच ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून पाहायचे. मात्र  'मिस्टर इंडिया'मुळे तिच्याकडे एक सक्षम अभिनेत्री म्हणून प्रेक्षक पाहायला लागले. आता श्रीदेवी आमच्यात नसली तरी केवळ तिच्यासाठी आम्ही या चित्रपटाचा रिमेक करत असल्याचं बोनी कपूर म्हणाले. 

शेखर यांचं वेळापत्रक व्यग्र नसल्यास ते या चित्रपटाचं दिग्दर्शन करतील अस बोनी कपूर मुलाखतीत म्हणाले. जुन्या चित्रपटातील काही कलाकारही यात पहायला मिळू शकतात असंही सूचक वक्तव्य  बोनी यांनी केलं आहे.  त्यामुळे  'मिस्टर इंडिया रिबूटमध्ये' कोणते कलाकार  पहायला मिळणार आहे याची उत्सुकता  सर्वांनाच आहे.