पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्रीदेवींची हत्या झाल्याचा संशय, डीजीपींना बोनी कपूर यांनी फटकारले

बोनी कपूर

बॉलिवूडमधल्या ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचा दीड वर्षांपूर्वी बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. मात्र डीजीपी ऋषिराज सिंह यांनी श्रीदेवींचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यांची हत्या घडवून आणल्याचा दावा केला आहे. यादाव्यामुळे श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी डीजीपींना फटकारलं आहे. 
'या केवळ कल्पना आहेत. मला यावर कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही. अशा मुर्खपणाच्या गोष्टी नेहमीच ऐकायला मिळत राहणार. याकडे दुर्लक्ष केलेलं बरं', असं बोनी स्पॉट बॉय ईला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

'नच बलिये'साठी अनिता हसनंदानीला सर्वाधिक मानधन?

ऋषिराज सिंह यांनी केरळच्या वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी 'श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचं' म्हटलं आहे. ऋषीराज सिंह यांनी  या लेखात जवळचे मित्र आणि फॉरेंसिक एक्सपर्ट दिवंगत डॉ. उमादथन यांच्या हवाला देत हा दावा केला आहे. 

श्रद्धाच्या लग्नावर वडील शक्ती कपूर यांनी दिली भन्नाट प्रतिक्रिया

'श्रीदेवी यांचा मृत्यू ही हत्या असू शकते. माणसानं कितीही मद्यपान केलं असलं तरी एक फूट पाण्यात बुडून त्याचा मृत्यू होऊ  शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीनं त्याचे पाय पकडून त्याला बुडवण्याचा प्रयत्न केला तर हे शक्य आहे असं उमादथन म्हणाले होते', असंही ऋषिराज सिंह यांनी आपल्या लेखात लिहीलं आहे यावरून बोनी कपूर यांनी ऋषिराज यांना फटकारले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Boney Kapoor has slammed DGP Rishiraj Singh insinuation that Kapoor wife Sridevi was murdered