पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'छपाक' चित्रपटाविरोधातील याचिका मागे; प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

छपाक

छपाक चित्रपटाविरोधात दाखल करण्यात आलेली 'स्वामित्व हक्क' उल्लंघनाची याचिका मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे छपाक चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. चित्रपट निर्माते राकेश भारती यांनी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि दिग्दर्शिका मेघना गुलजारविरोधात स्वामित्त्व हक्क भंग केल्याची तक्रार दाखल केली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली राकेश भारती यांनी केली होती. 

Video : पाहा, थरकाप उडवणाऱ्या ‘काळ’चा ट्रेलर

राकेश भारती यांच्या याचिकेवर बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. 'सत्य घटनेवर आधारित चित्रपटाच्या कथेवर कॉपीराईट कसा होऊ शकतो?, असा प्रश्न मुंबई हायकोर्टानं उपस्थित केला. त्यानंतर याचिकाकर्ते राकेश भारती यांनी आपली याचिका मागे घेतली. दरम्यान, कथेतील इतर घटनांशी साधर्म्य आढळल्यास कोर्टात दाद मागण्याचा पर्याय हायकोर्टानं याचिकाकर्त्यांसाठी खुला ठेवला आहे.

मराठा समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल अक्षय कुमारविरोधात तक्रार