पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'मध्ये हा ज्येष्ठ अभिनेता वडिलांच्या भूमिकेत

जयेशभाई जोरदार

रणवीर सिंग लवकरच 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात एका गुजराथी मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या  चित्रपटात रणवीरच्या वडिलांच्या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणींची निवड करण्यात आली  आहे. या चित्रपटाची कथा खूपच वेगळी आणि खास आहे, या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणं हे भाग्य असल्याचं बोमन इराणी म्हणाले.

रजनीकांतच्या 'दरबार'नं चार दिवसांत कमावले इतके कोटी

बोमन हे रणबीरसोबत काम करण्यास कमालीचे उत्सुक आहेत. रणवीर हा उत्साहाचा झरा आहे असंही बोमन म्हणाले. रणवीरनं या भूमिकेसाठी आपलं वजनही कमी केलं आहे. आतापर्यंत रणवीरनं साकारलेल्या भूमिकेपेक्षा ही भूमिका नक्कीच खूप वेगळी आणि हटके ठरणार आहे. 'जयेशभाई हा हिरो आहे. तो एक सर्वसामान्य माणूस आहे ज्याच्या आयुष्यात एक गंभीर समस्या उद्भवते, अशावेळी हाच सर्वसामान्य माणूस एक  असामान्य कृती करत या संकटातून मार्ग काढतो. समाजात स्त्री- पुरुषांना समान वागणूक मिळाली पाहिजे असं मानणारी ही व्यक्तीरेखा असल्याचं रणवीरनं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं.

बोमन इराणी

या चित्रपटात रणबीर आणि बोमन इराणीव्यतिरिक्त 'अर्जुन रेड्डी' या प्रसिद्ध तेलगू चित्रपटात दिसलेली अभिनेत्री शालिनी पांडे देखील दिसणार आहे.  या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. रणवीरसोबत बॉलिवूडमध्ये पदापर्ण करतेय ही माझ्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे. रणवीर हा बॉलिवूडमधला सध्याचा आघाडीचा आणि बहुआयामी व्यक्तीमत्त्व असलेला कलाकार आहे, अशी प्रतिक्रिया शालिनीनं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दिली. शालिनीनं या चित्रपटासाठी ऑडिशनही दिली असल्याचं समजत आहे.  २५ वर्षीय शालिनीनं रंगभूमीवरून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिनं तेलगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 

'कहो ना प्यार है' नंतर हृतिकला आल्या होत्या ३० हजार लग्नाच्या मागण्या