पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या मराठी अभिनेत्रीच्या रिक्षातून बोमन इराणींची सफर

बोमन इराणींचा रिक्षातून प्रवास

अभिनेता बोमन इराणी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. बोमन यांनी  मराठी अभिनेत्री लक्ष्मीच्या रिक्षातून सफर केली आहे. बोमन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओतून लक्ष्मीची ओळख चाहत्यांना करून दिली  आहे.  या व्हिडिओला सोशल मीडियावर खूपच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

लक्ष्मी ही मराठी मालिकांमध्ये काम करते पण त्याचसोबत रिक्षाही चालवते. ती खरी प्रेरणा आहे आणि त्याचबरोबर खऱ्या आयुष्यातील ती हिरो आहे. तिच्यात उत्साहाचा झरा वाहतो.  लक्ष्मी मला तुझा अभिमान वाटतो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असा संदेश लिहित बोमन यांनी लक्ष्मीसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.  तुम्हाला देखील भविष्यात तिच्या रिक्षात बसून प्रवास करायला मिळेन असं देखील बोमन  म्हणाले.

 बोमन यांनी हा व्हिडिओ आपल्या फेसबुकवरही शेअर केला आहे. अभिनेत्री ते रिक्षा चालक अशा दोन्ही भूमिकेत वावरणाऱ्या लक्ष्मीच कौतुक  सगळ्यांनी केलं आहे.