पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...अन सलमान खानने दिला कपिल शर्माला 'हा' सल्ला

सलमान खान, सुनिल ग्रोव्हर, कपिल शर्मा

कॉमेडियन कपिल शर्मा आजकाल 'द कपिल शर्मा शो' वरुन जास्तच चर्चेमध्ये आहे. अशातच बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने त्याला एक सल्ला दिला आहे. 'कपिल शर्मा शो खूप चांगला चालला आहे. त्याचा टीआरपी देखील चांगल्या स्तरावर आहे. अशामध्ये पुन्हा वादामध्ये अडकून पहिल्या सारखी चूक करु नको.' असा सल्ला सलमान खानने कपिल शर्माला दिला आहे. आईबी टाइम्सच्या मुलाखती दरम्यान सलमानने हे सांगितले आहे.  

राज ठाकरेंनी घेतली जयंत पाटलांची भेट; ईव्हीएमवर चर्चा ?

दरम्यान, 'द कपिल शर्मा शो'चा निर्माता सलमान खान आहे. अशातच शो बंद होऊ नये यांची चिंता सलमानला लागली आहे. त्यामुळेच सलमान खानने कपिल शर्माला हा सल्ला दिला आहे. आधीचा कपिल शर्मा शो सुनील ग्रोव्हरसोबत झालेल्या वादानंतर बंद पडला होता. सुनील ग्रोव्हरने शो सोडल्यानंतर कपिल शर्मा शोच्या टीआरपीमध्ये मोठी घसरण झाली होती. तर आता 'द कपिल शर्मा शो' पुन्हा सुरु झाला तो सलमान खानमुळे.  कारण सलमान खानने त्याची निर्मिती केली आहे. या शोच्या पहिल्या भागामध्ये सलमान खान त्याचे वडील सलीम खान यांच्यासोबत आला होता. 

CBSE बारावीच्या परीक्षा पद्धतीत महत्त्वाचे बदल

नुकताच द कपिल शर्मा शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा आले होते. त्याच्या आगामी चित्रपट 'जबरिया जोडी'च्या प्रमोशनसाठी ते आले होते. या शोला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 

गिरीश महाजन हे देशातील मोठे नेते, संजय राऊत यांचा टोला