पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध गायिकेला कोरोनाची लागण

कोरोना

बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध गायिकेला  कोरोनाची लागण झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. ही  गायिका आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी लंडनमधून लखनऊमध्ये काही  दिवसांपूर्वीच आली होती. तिनं आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला मोठी पार्टीही दिली होती. शुक्रवारी  उत्तरप्रदेशमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले एकूण चार नवे रुग्ण समोर आले आहेत यामध्ये बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध गायिकेचाही समावेश आहे.

कोरोनामुळे रणवीरच्या '८३' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

तिच्या पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात व्हीआयपी पाहुणे उपस्थित होते यात नेतेमंडळी आणि काही सेलिब्रिटींचाही समावेश असल्याचं समजत आहे.  त्यामुळे इथल्या स्थानिक यंत्रणेसमोर नवा पेच उभा राहिला  आहे. ही गायिका उत्तरप्रदेशमधल्या एक आलिशान इमारतीमध्ये राहते. तिची संपूर्ण इमारतीचेच विलगीकरण करण्यात येणार आहे. 

या पार्टीसाठी उपस्थित असलेल्या काही लोकांनी स्वत: पुढाकार घेऊन त्यांची आरोग्य चाचणी करण्याची मागणी केली आहे, मात्र यातले अनेकजण व्हीआयपी आहेत त्यांच्या चाचण्या कशा कराव्यात  असा पेच  इथल्या अधिकाऱ्यांना पडला आहे, अशी माहिती  इथल्या रुग्णालयातल्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे.

...म्हणून सलमानसोबत काम करण्यासाठी श्रद्धानं दिला होता नकार