पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंडियन आयडॉलच्या 'या' स्पर्धकासोबत जोडले नेहा कक्करचे नाव

नेहा कक्कर

बॉलिवूडची प्रसिध्द पार्श्वगायिका नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांच्या लव्हस्टोरीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. दोघांनी देखील सोशल मीडियावर एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र त्यांचे प्रेम फार दिवस टिकले नाही. ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांना आपल्या सोशल साइटवर ब्लॉक केले होते. या ब्रेकअपमुळे नेहा खूप दुखावली होती. तसंच तिला मानसिक धक्का देखील बसला होता. ब्रेकअपनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहा आपल्या मनातले दु:ख नेहमी व्यक्त करते. याच दरम्यान, नेहा कक्करच्या आयुष्याशी जोडलेली एक बातमी समोर आली आहे. नेहा कक्कर सध्या इंडियन आयडॉलचा स्पर्धक विभोर पाराशर याला डेट करत आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, 'भोंगा' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा

नुकताच नेहा कक्कर आणि विभोर पाराशर एका कार्यक्रमात सोबत दिसले होते. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेहा आणि विभोर यांचे सोबत फोटो पाहून सोशल मीडियावर त्यांचे अफेर सुरु असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ते एकमेकांना सध्या डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Nehuuu you only know to spread Happiness! 😇 The only word that’s not there in your dictionary is Negativity. People who spend time with you know very well How Positive You are!! The way you Sing, The way you Dance, The way you Perform on Stage, The way you Meet People, The way you talk to your NeHearts I can’t imagine Any Superstar being soo humble like You. One thing that’ll remain forever and Everyone would say this, that No one is and would Ever become Neha Kakkar!! 🙌🏼 The Singing Queen 👸🏻 ♥️ And In the end I would say.. I’m here because of You!! Thank you for Everything you’ve given me. I’ve learnt so much from You. Not just Singing but also how to become a Good Human being!! 🙏🏼 Thankyou for making Me and My Brother #KunalPandit @kunalpanditkp an Important part of The #NehaKakkarUSCanadaTour 🔥 Thanks to the whole Team and All the #NeHearts 🤗🙏🏼 . Yours Truely, #NeHeart #VibhorParashar . . Love You #Queen #NehaKakkar 😘. #NehaKakkarLive #IndianIdol10 #KunalPandit . Pic clicked by @themediatronic 🤗

A post shared by Vibhor Parashar (@vibhorparashar3official) on

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकार सरसावले

विभोर इंडियन आयडॉल 10 चा स्पर्धक होता. तर नेहा या कार्यक्रमाच्या परिक्षकपदी होती. नेहा आणि विभोर यांच्याबद्दल ज्या चर्चा सुरु आहे त्यामुळे विभोर खूप चिंतेत आला आहे. त्याने असे म्हटले आहे की, 'या चर्चा अफवा आहेत. लोकांची मानसिकता योग्य नाही. जर एखादी व्यक्ती एखाद्यास आपले करिअर बनवण्यामध्ये मदत करत असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी टँलेट असेल. मी सोशल मीडियावर नेहाला दीदी बोलत नाही त्यामुळे लोकांना वाटते की ती माझी गर्लफेंड आहे. मात्र असे काहीच नाही आहे.'

कलम ३७० : पाकिस्तानची भारतीय चित्रपटांवर बंदी