पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे मनोरंजन विश्वाला ८०० कोटींचा फटका?

कोरोनामुळे मनोरंजन विश्वाला  फटका

कोरोनामुळे मनोरंजन विश्वालाही मोठा फटका बसला असल्याचं दिसून येत आहे. कोरोनामुळे अनेक चित्रपटांचं परदेशी होणारं चित्रीकरण रद्द झालं आहे. राज्यातील विविध भागात चित्रपटगृह बंद करण्यात आली आहेत. कोरोना विषाणूमुळे बॉलिवूडला ८०० कोटींचा फटक बसला असल्याचं वृत्त मुंबई मिररनं प्रकाशित केलं आहे. 

त्या फोटोमुळे किआरानं सोशल मीडियावर केला हा बदल

महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, गुजरात, बिहार, पंजाबमधल्या  ३५०० हून अधिक चित्रपटाच्या स्क्रिन्स बंद ठेवण्यात आल्या आहेत. गेल्याच आठवड्यात इरफानचा 'अंग्रेजी मीडिअम' चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र राज्यात फैलावत चाललेल्या कोरोनामुळे चित्रपटगृह बंद ठेवण्यात आली आहे. या चित्रपटानं केवळ ९.५ कोटींची कमाई केली आहे. तर 'बागी ३' चित्रपटालादेखील २० ते २५ कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे.  अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे.

जेम्स बाँड फेम अभिनेत्रीला कोरोना विषाणूची लागण

देशातील चित्रपट संघटनांनी १९ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सीरिज आणि जाहिरात असे कुठलेही चित्रीकरण केलं जाणार नाही. परिणामी या क्षेत्राला जवळपास ८०० कोटींचं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार असल्याचं समोर आलं आहे.