पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गेल्या पाच वर्षांत केवळ ८ बॉलिवूड चित्रपटांची कमाई ३०० कोटींच्या घरात

वॉर

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बिग बजेट, मल्टी स्टारर आणि आघाडीच्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यातल्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १००  ते २००  कोटींचा गल्ला जमवला आहे. तर काही निवडक चित्रपटांनी ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत ८ चित्रपटांनी ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे हे चित्रपट कोणते ते पाहून. 

 पीके
 २०१४ साली आलेलेल्या आमिर खान, सुशांत सिंह राजपूत आणि अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटानं ३०० कोटी कमावले होते. गेल्या पाच वर्षांतला ३०० कोटींची कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर, अजयचा पहिला लूक प्रदर्शित

बजरंगी भाईजान, सुलतान, टायगर झिंदा है
३०० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अभिनेता सलमान खानच्या तीन चित्रपटांचा समावेश आहे.  २०१५ साली आलेला सलमानच्या 'बजरंगी भाईजान'ला तुफान प्रसिद्धी लाभली होती. या चित्रपटानं ३०० कोटींची कमाई केली होती. चित्रपट चीनमध्येही प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१६ साली आलेल्या अनुष्का शर्मा आणि सलमानच्या सुलतानलाही चांगला प्रतिसाद लाभला. या चित्रपटानंही ३०० कोटींचा गल्ला जमवला. टायगर झिंदा है हा चित्रपट २०१७ साली आला. यावेळी कतरिना आणि सलमानची जादू पडद्यावर पाहायला मिळाली. 

दंगल
२०१६ साली आलेला दंगल हा आमिर खानचा ३०० कोटींचा गल्ला जमवणारा दुसरा चित्रपट ठरला होता. 
पद्मावत 
राणी पद्मावतीच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटानं ३०० कोटींची कमाई केली होती. २०१८ साली आलेल्या या चित्रपटात दीपिका पादुकोनसह शाहीद कपूर  आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत होते.

घराबाहेर जमलेल्या चाहत्यांची बच्चन यांनी मागितली माफी

 संजू 
अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. २०१८ साली  आलेल्या या चित्रपटाला अल्पावधिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. चित्रपट अनेक मुद्द्यावरून वादात सापडला असला तरी बॉक्स ऑफिवर चित्रपटानं ३०० कोटींची कमाई केली. 
वॉर 
३०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचलेला हृतिक आणि टायगरचा  वॉर हा दुसरा चित्रपट ठरला. या चित्रपटानं कमी वेळात ३०० कोटींची कमाई केली.