पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या पाच चित्रपटांमुळे बॉलिवूडनं कमावले ७०० कोटी

ऑगस्ट, सप्टेंबरमधील हिट चित्रपट

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. या चित्रपटांची एकूण कमाई ही ७०० कोटींच्या घरात आहे. श्रद्धा- प्रभासचा 'साहो' वगळता इतर चार चित्रपटांची निर्मीती ही  कमी बजेटमध्ये करण्यात आली  होती. विशेष म्हणजे निर्मिती खर्चापेक्षा दुप्पट कमाई या चार चित्रपटांनी केली आहे.

'दयाबेन' करणार 'तारक मेहता...'मध्ये कमबॅक, निर्माते सकारात्मक

७०० कोटींची कमाई करण्यात मल्टी स्टारर 'मिशन मंगल', जॉन अब्राहमचा  'बाटला हाऊस', श्रद्धा कपूर - सुशांत सिंह राजपूतचा 'छिछोरे', आयुष्मान खुरानाचा 'ड्रिम गर्ल' आणि प्रभासच्या 'साहो' चित्रपटाचा वाटा अधिक आहे. या पाच चित्रपटांची एकूण कमाई  जवळपास ७०० कोटींच्या घरात आहे. अक्षय कुमार, विद्या बालनसह अनेक कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मिशन मंगल'नं २०० कोटींहून अधिकची कमाई बॉक्स ऑफिसवर केली. 

निपुणनं घटवलं वजन, आठ- दहा वर्षांपूर्वीचे कपडे आता आले उपयोगात

श्रद्धा कपूर - सुशांत सिंह राजपूतच्या 'छिछोरे'नं १४४. ६० कोटींची कमाई केली. आयुष्मान खुरानाच्या 'ड्रिम गर्ल' १२७ कोटींची कमाई केली. प्रभासच्या साहोनं ५० कोटींहून अधिकची कमाई केली तर 'बाटला हाऊस'ची कमाई ही  १०० कोटींच्या जवळपास जाणारी होती.